Viral Video : काकूंचा धूम स्वॅग! ट्रेनच्या बरोबरीने सुसाट वेगात पळवली लूना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : काकूंचा धूम स्वॅग! ट्रेनच्या बरोबरीने सुसाट वेगात पळवली लूना

काही कामं असे असतात त्यामध्ये आवड असली की आपल्याला सवड मिळते. तर काही कामे आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार करावी लागतात. पण काही कामामध्ये आपल्याला वय आडवे येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला स्कुटीवरून सुसाट वेगाने चाललेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका ट्रेनमधून शूट करण्यात आला आहे. तर दोन महिला एका लूना गाडीवरून जात असताना दिसत आहेत. ट्रेनमधून शूट करत असलेल्या कॅमेऱ्याकडे पाहून त्या हात दाखवत आहेत. तर कॅमेऱ्यामध्ये पाहून हसतानाही दिसत आहे. त्यांची सुसाट चाललेली गाडी पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

दरम्यान, या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १ लाख २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आत्तापर्यंत या व्हिडिओवर एक हजार दोनशे लोकांनी कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :bullet trainviral video