Viral Video : 'इलॉन मस्काय नम:' पुरूषांकडून आरती ओवाळत इलॉन मस्कच्या फोटोची पूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

Viral Video : 'इलॉन मस्काय नम:' पुरूषांकडून आरती ओवाळत इलॉन मस्कच्या फोटोची पूजा

इलॉन मस्क हे आता जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याचबरोबर ते टेस्लाचे CEO देखील आहेत. तर बंगळुरू येथील पुरूषांच्या समस्यावर आणि हक्कावर काम करणाऱ्या एका संघटनेने इलॉन मस्कची पुजा केली आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुरूषांच्या अधिकारावर काम करणारी संघटना असलेली SIFF ने या पूजेचे आयोजन केले होते. तर एका व्यक्तीने हातात अगरबत्ती घेऊन आरती ओवाळली आहे. त्याचबरोबर "अदानी, अंबानी तुम्ही इलॉन मस्क यांच्याकडून काहीतरी शिका" असा संदेशही पुरूषांकडून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :Elon Muskviral video