
Viral : तो आला, पेट्रोल टाकलं अन् अख्ख दुकानंच दिलं पेटवून; झोप उडवणारा Video
केरळ : केरळमधील त्रिपुनिथुरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. राजेश टीएस नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर धमकी देऊन लॉटरीचे दुकान पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपीने पहिल्यांदा या दुकानदाराला फेसबुक लाईव्ह वरून धमकी दिली आणि त्यानंतर बाटलीत पेट्रोल घेऊन येत लॉटरीचे दुकान पेटवून दिले. यावेळी दुकानात काही लोकं होते. पण दुकान पेटवून दिल्यानंतर लोकांनी बाहेर पळ काढला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी शेअर केला आहे.
या घटनेनंतर दुकानदाराने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण ती आग आटोक्यात आली नाही. यामध्ये लॉटरी दुकानदाराचे किमान दीड लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने दुकानाला आग का लावली हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.