
Viral Video : बाप बाप असतो! बापलेकीच्या नात्याचा हा व्हिडिओ पाहून भावूक व्हाल
आपल्या लेकरांना वाढवण्यात आईचा जेवढा वाटा असतो तेवढाच वाटा वडिलांचासुद्धा असतो. वडील प्रत्यक्षपणे जरी मुलांना वाढवण्यात सामील नसले तरी ते कुटुंबासाठी सर्वांत मोठा आधार असतात. सध्या असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक बाप आपल्या मुलीला मदत करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रेसिपी स्पर्धेतील आहे. पदार्थ बनवत असताना मुलीला एका डब्याचं झाकण उघडत नाही, वेळ कमी असतो पण तिला झाकण उघडत नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये असलेल्या वडिलांकडे ती पळत जाते आणि डब्याचं झाकण उघडून घेते. वडील एका क्षणात झाकण उघडून देतात. एवढ्या गर्दीतही मुलगी आपल्या वडिलांकडेच पळत जाते म्हणून "बाप हा हिरोच असतो" अशा कमेंट या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.