
Viral Video : बाप बाप असतो! गाडी पडली, तोही कोसळला पण चिमुकलं बाळ...; थरारक प्रसंग
बाप बाप असतो! असा डायलॉग आपण कित्येकदा ऐकला असेल. पण या डायलॉगची अनुभूतीसुद्धा आपल्याला अनेकदा आली असेल. बाप आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी किंवा संकटातून वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभा केलेल्या दुचाकीवर झोपलेला आपल्याला दिसत आहे. तर त्याच्या हातात एक लहान बाळ दिसत आहे. उतरताना त्याचा पाय गाडीच्या हँडलला लागतो आणि गाडी खाली कोसळते. त्याचवेळी तोही खाली कोसळतो पण त्याच्या हातातल्या बाळाला तो खाली पडू देत नाही.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओवर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सदर व्यक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या व्हिडिओमधून प्रत्येक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो हे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला आहे.