Video Viral : प्रेक्षकातून भावाने 'सोडलं विमान' अन् थेट 'गोल'च झाला

Video
VideoSakal

क्रिकेटच्या खेळातील मनोरंजक दृश्ये आपण कित्येकदा पाहिले असतील. काही प्रेक्षक काहीतरी कृती करून कॅमेरामनचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात. तर काहीजण प्रेक्षकामध्ये आपल्या प्रेयसीला प्रपोज करून काहीतर नवीन करण्याचा प्रयत्न करतात. तर फुटबॉलच्या ग्राऊंडमधून असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा फुटबॉलच्या ग्राऊंडमधील असून एक मुलगा कागदी विमान ग्राऊंडवर सोडताना दिसत आहे. तर ते विमान थेट नेटमध्ये जाऊन पडते. त्यानंतर त्या मुलांचा आणि बाकीच्या प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान आपण लहानपणी असे अनेक विमानं सोडले असतील पण फुटबॉलच्या ग्राऊंडवर विमान सोडण्याचा व्हिडिओ आपणही पहिल्यांदाच पाहत असाल.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com