Video : पिऊन झिंगाट झालेल्या तरूणींचा 'पब'बाहेरच राडा; चौघींनी एकीला धू धू धुतलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video : पिऊन झिंगाट झालेल्या तरूणींचा 'पब'बाहेरच राडा; चौघींनी एकीला धू धू धुतलं

भोपाळ : चार तरूणींनी दारूच्या नशेत एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. तर मारहाण करणाऱ्या चारही महिलांनी मद्यपान केलं होतं अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांनी या महिलेचा मोबाईलही रस्त्यावर आपटला आहे. गुरूवारी रात्री ही घटना झाल्याची माहिती असून यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(Drunken Girls Beating Another on Road Viral video)

दरम्यान, गुरूवारी रात्री ही घटना झाल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी या चार महिलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चार महिला एका महिलेला बुक्का, लाथांनी मारत आहेत. तर ती महिला ओरडत असतानाही त्यांनी तिला मारायचं थांबवलं नाही. त्यामुळे या चौघीजणींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोकं शेजारी उभे आहेत पण त्यांनीही या महिलांना आवरण्याचा प्रयत्न केला नाही. तर जखमी झालेल्या महिलांनीही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रार नोंदवून घेतली आहे.