
Natu Natu Fever : जर्मन एंबसी स्टाफवर चढला नाटू नाटू फीवर, भर चौकातला हा Viral Video पाहिलात का?
German Ambacy Natu Natu Viral Video : नाटू नाटू गाण्याने ऑस्करला बाजी मारल्यावर संपूर्ण देशातच नाही तर जगातच या गाण्याची क्रेझ नव्याने निर्माण झालेली दिसते. गाण्याचा ऱ्हीदम आणि डान्स स्टेप्स यामुळेतर गाण जास्तच फेमस होऊ लागलं आहे. यामुळेच सध्या या गाण्यावर परदेशी नागरिकांनी एकत्र येऊन केलेला डान्स सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या चांदणी चौकात जर्मन एंबसीच्या स्टाफने हा डान्स केला आहे. याचा व्हिडीओ आणि परेदशी नागरिकांनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. विदेशी स्त्रिया-पुरुष असा मोठा ग्रुप रस्त्यावर भर चौकात हा डान्स करताना दिसत आहेत.
कमी काळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात बघितला गेला आहे. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर, यूट्यूब अशा सगळ्याच सोशल मीडियावर तो बघायला मिळत आहे. यात सकाळचं चांदणी चौकातलं आयुष्य आणि या विदेशी लोकांचं देशी गाण्यावरच नृत्य एकूण फूल पॅकेज नेत्र सुख देणारा हा व्हिडीओ आहे.