Viral Video : झाडावर उलटी लटकायला गेली अन् थोबाडावर आपटली 'पापा की परी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : झाडावर उलटी लटकायला गेली अन् थोबाडावर आपटली 'पापा की परी'

अनेक जणांना बिनकामाचे स्टंट करण्याची सवय असते. जास्तीचा आत्मविश्वास कधीती आपल्या अंगलट येत असतो. याची प्रचिती अनेकांना येत असते. सध्या असाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती झाडाला लटकताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ती खाली पडली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला जास्तीचा आत्मविश्वास दाखवते आणि एका झाडाच्या फांदीला उलटं लटकण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या वजनाने ती फांदी तुटते आणि तिच्यासहित ती फांदी खाली पडते. या घटनेमध्ये सदर महिलेला जबर मार लागला आहे. त्यामुळे नसता आत्मविश्वास कधीकधी अंगलट येऊ शकतो हे समजून घ्यायला पाहिजे. "ही तर पापा की परी" आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.