Viral Video : वीज कडाडली अन् भर पावसात झाडाला लागली भीषण आग; घटना कॅमेऱ्यात कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : वीज कडाडली अन् भर पावसात झाडाला लागली भीषण आग; घटना कॅमेऱ्यात कैद

पावसाळ्यात अनेक मोठमोठ्या दुर्घटना होत असतात. मुसळधार पावसामुळे अनेकांचे जीव गेल्याचं आपल्याला माहिती असेल. महापूरासारखे संकट पावसाळ्यात येत असतात. तर वीज पडून कित्येक जणांचा जीव जात असतो. सध्या वीज कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वीज कोसळतानाचे लाईव्ह दृश्य दिसत आहेत. तर एका घराच्या गॅलरीतून एक जोडपे या घटनेचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. वीज कोसळल्यानंतर झाडाला मोठी आग लागल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, पावसाळ्यात सहसा झाडावर वीज कोसळल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. त्यामुळे पावसात झाडाखाली थांबण्याचे टाळले पाहिजे. त्याचबरोबर वाऱ्यामुळे, वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटत असतात त्यामुळेही दुर्घटना घडू शकतात. म्हणून पावसाळ्यात अशी काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.