Viral Video : विमानातच तरूणीचा हाफ स्कर्टवर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, दिल्ली मेट्रो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : विमानातच तरूणीचा हाफ स्कर्टवर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, दिल्ली मेट्रो...

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. विनोदी डान्स किंवा भन्नाट डान्स आपण पाहिले असतील. पण हवेतील विमानात डान्स करताना आपण कधी पाहिले नसतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती विमानात हाफ स्कर्टवर डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी स्कीन कलरच्या स्कर्टमध्ये डान्स करत आहे. तर ती डान्स करत असताना विमानातील अनेक प्रवाशी तिच्याकडे बघत आहेत. तिचा व्हिडिओ पाहून अनेकजण घायाळ झाले असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. या कमेंट वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. "विमानाची तरी दिल्ली मेट्रो करू नका" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दिल्ली मेट्रोमधील अनेक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी अशा कमेंट केल्या आहेत.