

viral video news
esakal
चेन्नईहून हावडाकडे जाणाऱ्या लोकप्रिय हावडा मेल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक १२८४०) स्लीपर कोचमध्ये १० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळून आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी तात्काळ इमरजेंसी चेन खेचून गाडी थांबवली. अजगर वॉशबेसिनजवळ सापडल्याने कोचमधील वातावरण तणावपूर्ण झाले आणि प्रवाशांनी ओरड करत पळापळ सुरू केली.