जपानी तरूणीचा भारतात छळ प्रकरण; आरोपींना पोलिसांकडून अटक | Japanese Girl Harassment Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Japanese Young Girl

जपानी तरूणीचा भारतात छळ प्रकरण; आरोपींना पोलिसांकडून अटक | Japanese Girl Harassment Case

होळीच्या दिवशी दिल्ली येथील काही तरूणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते एका जपानी पर्यटक असलेल्या तरूणीचा बळजबरीने रंग लावून तिचा छळ करताना दिसत आहेत. या व्हिडिओची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून सदर व्हिडिओमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. तर तीन ते चार जण जपानी मुलीच्या अंगाला बळजबरीने रंग लावताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ही तरूणी तिथून निघून गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला होता. हा व्हिडिओ माध्यमांनी जास्तीत जास्त व्हायरल केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.

व्हिडिओची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. महिलेच्या तपशीलासाठी जपानी दूतावासाला पाठवलेला ईमेल आणि व्हिडिओमध्ये दिसणार्‍या पुरुषांची माहितीही गोळा केली जात आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्लीतील पीएस पहाड गंज परिसरातील आहे. ही मुलगी जपानी पर्यटक असून ती पहाडगंज येथे राहात होती. ती सध्या बांगलादेशला रवाना झाली आहे. मुलीने दिल्ली पोलिसांकडे किंवा दूतावासात कोणतीही तक्रार केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, या संबंधित एका अल्पवयीन मुलासह तीघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याविरुद्ध डीपी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई मुलीच्या तक्रारीनुसार केली जाणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.