I dont know hindi म्हणणाऱ्या महिला पोलिस अधिकारी होतायत ट्रोल; Video पाहून म्हणाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

I dont know hindi

I dont know hindi म्हणणाऱ्या महिला पोलिस अधिकारी होतायत ट्रोल; Video पाहून म्हणाल...

तामिळनाडू येथील महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. I don't know hindi असं सदर महिला पोलीस अधिकारी पत्रकारांना बोलताना दिसत आहे. या व्हिडिओला ट्वीटरवर चांगलच ट्रोल केलं जात असून अनेकांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पत्रकार सदर महिला पोलीस अधिकाऱ्याला इंग्रजीमधून प्रश्न विचारतो, एका प्रकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला अधिकारी I don't know hindi असा रिप्लाय देते. "मी तर हिंदीतूनच प्रश्न विचारला आहे ना?" असं पत्रकार म्हणाल्यानंतर महिला अधिकारी काहीच न बोलताना निघून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, आपल्याला समोरच्या व्यक्तींनी ज्या भाषेत विचारलं ती आंतरराष्ट्रीय भाषा असून ती भाषा कळत नसेल तर आपले अधिकारी असे कसे? असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर असे अशिक्षित अधिकारी आपल्याला लाभले असल्याचंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. ट्वीटरवर या महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून या महिला अधिकाऱ्याला ट्रोल केलं जात आहे.