Sat, December 2, 2023

Video Viral : 'क्या हुआ तेरा वादा...'; लोकलमध्ये अंकलने गायलं भन्नाट गाणं
Published on : 24 September 2023, 8:52 am
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, लग्न, डान्स, अपघात, सीसीटीव्ही फुटेज अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या लोकलमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती गाणं गाताना दिसत आहेत.
लोकलने प्रवास करणारे सगळे व्यक्ती सदर व्यक्तीचे गाणे ऐकत असून त्यांच्या गाण्याला दाद देताना दिसत आहे. "क्या हुआ तेरा वादा" हे गाणं ते गात असून सगळे लोकं ऐकून त्यांना दाद देत आहेत. प्रवास सुरू असताना लोकलच्या डब्यात सगळी शांतता असून फक्त या अंकलच्या गाण्याचा आवाज येताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सोशल मीडियावर या व्हिडिओ पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.