
Python Video : पिंट्यांची मैत्री अजगरासोबत; खेळतोय असा की हातात आहे ससा
साप किंवा अजगर पाहिलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते. अनेकदा प्रत्यक्षात साप पाहिला तर पळता भुई थोडी होते. प्रत्येकालाचा सापाची किंवा अशा जंगली प्राण्यांची भिती वाटत असते. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून आपली झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये चिमुकला चक्क अजगराशी खेळताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकल्या त्याच्यापेक्षा जवळपास १० पट मोठ्या असलेल्या अजगरासोबत खेळताना दिसत आहे. अजगराचा आकार आणि लांबी अवाक् करणारी आहे. त्याचबरोबर त्याची जाडी पाहून अजगराने काहीतरी गिळल्यासारखं वाटत आहे. हा अजगर आक्रमक झाला तर चिमुकल्याला गिळून टाकण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, थरकाप उडवणारा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. ट्वीटरवर figen या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या चिमुकल्याच्या पालकांना त्याची काही काळजी आहे की नाही? असा विचार आपल्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही.
अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केलं असून हा अजगर पाळीव असल्याचं बोललं जातंय. तर आपण आपल्या पाल्यांना असं सोडू नये, लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.