Viral Video : "भोळ्या भावाची भाबडी ही माया"; भावा-बहिणीचा व्हिडिओ पाहून भावूक व्हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : "भोळ्या भावाची भाबडी ही माया"; भावा-बहिणीचा व्हिडिओ पाहून भावूक व्हाल

लहान मुले निरागस असतात. त्यांना एखाद्याची मदत करण्यासाठी काही कारण लागत नसतं. त्यांच मन पवित्र असतं म्हणूनच त्यांना देवाघरची फुलं असं म्हणतात. सध्या अशाच लहान बहीण भावंडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये भाऊ आपल्या लहान बहिणीसाठी ट्रॅम्पोलीनवरून खाली उतरवण्यास मदत करतो.

व्हायरल होत असलेला गोड व्हिडिओ पाहून आपणही भावून व्हाल. या व्हिडिओमध्ये लहान भाऊ त्याच्यापेक्षा लहान असलेल्या बहिणीला खाली उतरण्यासाठी तिला पाठीवर घेत आहे. ती भावाच्या पाठीवर पाय ठेवून खाली उतरते. हा व्हिडिओमधून आपल्याला लहान बहिणभावांमधील नातं किती घट्ट असतं हे समजेल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.