
Video : 'ओ अंटावा' वर चिमुकलीचा डान्स; व्यासपीठ सोडून प्रेक्षकांमध्येच गर्दी
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, लग्न, अपघात, सीसीटीव्ही, अश्लील व्हिडिओंचा सामावेश असतो. तर अनेकदा काही व्हिडिओ आपल्याला भावनिक करत असतात. सध्या एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तिने एका कार्यक्रमात भन्नाच डान्स केला आहे.
पुष्पा या सुपरहीट चित्रपटातील ओ अंटावा या प्रसिद्ध गाण्यावर या चिमुकलीने डान्स केला असून ती अवघी आठ ते दहा वर्षांची आहे. तिने केलेला पुढे कार्यक्रम सुरू असतान खुर्चीवरून उठून प्रेक्षकांमध्येच तिने डान्स केला आहे. तर तिचा डान्स पाहून प्रेक्षक फिदा झाले आहेत. कार्यक्रमासाठी बसलेल्या महिलासुद्धा व्यासपीठ सोडून तिचा डान्स पाहत बसल्याचं दिसत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून ३ लाख ५० हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या चित्रपटातील नायिकेला सुद्धा लाजवेल असा हा डान्स असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.