"हंबीररावांवर वार करणाऱ्या सर्जा खानला मारावंच लागेल" चिमुकलीचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

"हंबीररावांवर वार करणाऱ्या सर्जा खानला मारावंच लागेल" चिमुकलीचा Video Viral

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. लहान चिमुकल्यापासून ते थोरामोठ्यापर्यंत त्यांची युद्धनिती आणि रणनिती शिकवली जाते. तर त्यांच्यावर आधारित चित्रपटांचा प्रभावही लहान मुलांवर पडत असतो. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहून आल्यावर तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इंस्टाग्रामवरील Shwetapawarchorge या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोन मायलेकींचा संवाद असून हंबीरराव चित्रपट पाहून आल्यावर या चिमुकलीने आक्रमक मावळ्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या चिमुकलीची आई तिला विचारते "कुणाचा राग आलाय?" त्यावर ती म्हणते, "सर्जा खान, ज्याने हंबीररावावर वार केलाय तो सर्जा खान. आपण त्याच्यावर तलवारीने वार करायचा, त्यासाठी एक मोठी तोफ तर आणावी लागेल... त्याशिवाय तो काय मरणार नाही. त्या सर्जा खानाला मारावं लागेल नाहीतर मग काही उपयोग नाही. सर्जा खान खूप डेंजर आहे ना, मग त्याला आता मारावंच लागेल, नाहीतर तो शिवाजी महारांना पण मारू शकतो सर्जा खान किती मोठा आहे, जाडा आहे?"

त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जात असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या आहेत. "आईवडिलांनी या मुलीवर खूप छान संस्कार केले आहेत, मर्दानी झाशीची राणी.. आणि अतुलनीय प्लॅनिंग" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.