Video Viral : दारू पिल्यामुळे केली होती अटक; जेलमध्ये गाणं गात जिंकले पोलिसांची मने

या दारूड्याने गाणं गायलं अन् महिला पोलिसही लाजल्या
Video Viral
Video ViralSakal

कलेला मरण नसते असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीकडे कला असेल तर त्याला ती सादर करायला कशाची गरज नसते. गरज असते ती फक्त दर्दी प्रेक्षकांची. अशाच एका कैद्याची कलाकारी जेलमध्ये दिसून आली आहे. तो जेलमध्ये चांगलाच सूर लावून गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कैदी गाणं गात आहे. तो दारू पिल्यामुळे त्याला अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. 'दरोगा जी हो...चार दिन से पियवा बा लापता' हे भोजपुरीमधील गाणं तो गुणगुणत आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा हा व्हिडिओ शूट केला आहे.

दरम्यान, अवनीश सरन यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ६ हजार दोनशे लोकांनी या व्हिडिओला शेअर केलं असून अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com