
Viral Video : शून्य मिनिटात मिळालं कर्माचं फळ; मुक्या जनावराला मारणं पडलं महागात
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ, डान्सचे व्हिडिओ, अपघाताचे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजचा सामावेश असतो. पण काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाळीव कुत्र्याला काठीने मारताना दिसत आहे. त्याने काठीने मारल्यानंतर लगेच कुत्र्याने त्याला चावा घेत त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्या व्यक्तीने केलेल्या कर्माचं फळ त्याला काही क्षणात मिळालं आहे. या व्हिडिओतून आपल्यालाही मोठी शिकवण मिळेल.
दरम्यान, ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या असून नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर असे अनेक व्हिडिओ आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन जात असतात. हल्ला करू शकणाऱ्या प्राण्याच्या खोडी काढू नये हा मोठा धडा या व्हिडिओमधून मिळतो.