बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करताना नवऱ्याने बायकोला रंगेहात पकडलं; झालं तुफान भांडण | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करताना नवऱ्याने बायकोला रंगेहात पकडलं; झालं तुफान भांडण

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, लग्नातील, स्टंटचे, डान्सचे, अपघाताचे, सीसीटीव्ही फुटेज, भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या नवरा बायकोमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका दाम्पत्याचा आहे. त्यामध्ये बायको आणि नवरा एकमेकांशी भांडताना दिसत आहे. नवऱ्याने बायको आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करत असताना पकडल्यामुळे हे भांडण सुरू असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नवऱ्याने आणि बायकोनेही या भांडणाचा व्हिडिओ काढलेला असून बायको स्टुलवर बसून नवऱ्याला भांडत आहे. दोघेही एकमेकांच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. घर के कलेश या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपलं मत व्यक्त केलं आहे. सदर महिलेच्या विरोधातील अनेक कमेंट या व्हिडिओखाली आपल्याला वाचायला मिळतील.