
Video Viral : महाशिवरात्रीसाठी कावड घेऊन जाणाऱ्यांना पाण्याऐवजी पठ्ठ्याने वाटली दारू
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या रस्त्यावर कावड घेऊन जाणाऱ्या लोकांना दारू वाटणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच
महाशिवरात्रीनिमित्त महादेवासाठी अनेक लोकं कावड घेऊन जात असतात. कावड घेऊन जात असलेल्या लोकांना अनेक जण पाणी देत असतात. पण उत्तरप्रदेशमधील अलीगढ येथील एका व्यक्तीने चक्क बिअरच्या कॅन वाटल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
देवत्रगढ हॉस्पिटल, रामघाट रोड, अलीगढ येथील हा प्रकार असल्याची माहिती असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.