Viral Video : गाय अन् वासराला खाऊ घातली पाणीपुरी; व्यक्तीने जिंकले नेटकऱ्यांची मने

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral Video Sakal

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. तर सध्या रस्त्यावरील गायीला आणि तिच्या वासराला पाणीपुरी खाऊ घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

एक व्यक्ती पाणीपुरीच्या ठेल्यावर उभा असलेला या व्हिडिओत दिसत आहे. तर तिथे गाय आणि तिचे वासरू उभे आहे. सदर व्यक्ती गायीच्या वासराला आणि गायीला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे. हे दृश्य पाहून या व्यक्तीने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून वासरू आणि गायीचे अनेक आशिर्वाद या व्यक्तीला भेटले असतील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com