Viral Video : गाडी थांबवून जंगली हत्तीसमोर व्यक्तीने उंचावले हात; खवळलेल्या हत्तीने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral VIdeo

Viral Video : गाडी थांबवून जंगली हत्तीसमोर व्यक्तीने उंचावले हात; खवळलेल्या हत्तीने...

आपण अनेकदा बाहेर फिरायला जात असताना जंगलातून प्रवास केला असेल. जंगलातून प्रवास करत असताना जंगली प्राण्यांचे दर्शन आपल्याला होत असते. तर अनेकदा आपल्या गाड्यांना आडवे जाणारे प्राणीसुद्धा असतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चारचाकी गाडीतून उतरून जंगलातील सुळे असलेल्या हत्तीच्या समोर जातो. हत्ती खवळलेल्या अवस्थेत व्यक्तीवर किंचाळताना दिसत आहे. तर त्यानंतरही सदर व्यक्ती न घाबरता त्याच्यासमोर हात जोडून उभा असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, रमेश पांडे या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "हत्ती खवळलेला होता पण त्याने तरीसुद्धा या व्यक्तीवर हल्ला न करता त्याला जाऊ दिले" असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. पण थोडी जरी हालचाल झाली असती तर हत्तीने या व्यक्तीवर हल्ला केला असता.

सदर प्रकार पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सदर व्यक्तीवर टीका केली आहे. जंगली प्राण्यांना त्रास का देतात म्हणत नेटकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आपणही जंगलातून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. कारण स्टंट करणे कधीकधी महागात पडू शकते.

टॅग्स :Elephantjungle