Video Viral : 'मान मेरी जान'; उडत्या विमानात, 36 हजार फूट उंचीवर कपलचा भन्नाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : 'मान मेरी जान'; उडत्या विमानात, 36 हजार फूट उंचीवर कपलचा भन्नाट डान्स

विमानाने कधी प्रवास केला आहे का? अनेक जणांनी विमानाने प्रवास केला नसेल पण सध्या एका कपलने उडत्या विमानात डान्स केला आहे. या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. जमिनीपासून तब्बल ३६ हजार फूट उंचीवर हा डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून हे प्रीवेडिंग शूट असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. लग्नाआधी या कपलने विमानात प्रीवेडिंग शूट केलं असून हा ठरवून केला गेलेला कार्यक्रम आहे. ज्यावेळी विमानात हा डान्स केला गेला त्यावेळी विमान ३६ हजार फूट उंचीवर होते असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :weddingdanceviral video