Viral Video : मगरीच्या तोंडात जबडा ठेवून मृत्यूला निमंत्रण; झोप उडवणारा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मगरीच्या तोंडात जबडा ठेवून मृत्यूला निमंत्रण; झोप उडवणारा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काहीतरी स्टंट करणाऱ्या पठ्ठ्यांची कमी नसते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्याने मगरीच्या महाकाय जबड्यावर आपली मान ठेवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपली झोप उडल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसला असून मगरीच्या भल्यामोठ्या जबड्यावर या व्यक्तीने आपली हनुवटी ठेवली आहे. तर मगर वर पाहत असताना आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सदर व्यक्ती मगरीच्या तोंडाकडे हात नेण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, व्यक्ती मगरीच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न करत असताना मगरीने क्षणात जबडा मिटवला आणि व्यक्तीने तेवढ्याच तत्परतेने आपला हात बाहेर काढून घेतला. व्यक्तीने जर आपला हात बाहेर काढला नसता तर त्याचा हात मगरीच्या जबड्यात अडकला असता. त्यामुळे त्याचा हात तुटला असता.

ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलच शेअर केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल. दरम्यान, असे प्रयोग आणि स्टंट करताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कधीकधी असे स्टंट जीवावर बेतत असतात.

टॅग्स :crocodileviral video