Viral Video : "...आणि अशा प्रकारे घरातच झाली परमाणुची यशस्वी चाचणी"

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
Video Viral
Video ViralSakal

आपण घरी कधी भाजीला तडका दिला आहे का? तडका कसा द्यायचा आपल्याला माहिती असेल पण तडका देण्याचा आगळावेगळा प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तडका देताना उडालेल्या भडक्याने आपल्या हृदयात धडकी भरेल. सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण भाजीला तडका देताना दिसत आहे. घरातील गॅसवर तो एका चमचामध्ये तेल आणि सामान टाकून गरम करत असतो. तेल गरम झाल्यावर ते पेट घेते आणि त्यानंतर तो भाजीच्या पातेल्यात टाकतो. त्यानंतर पातेल्यातून मोठा जाळाचा भडका उडतो. भडका उडाल्यानंतर पातेल्यावरील झाकणही उडून जाते.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या असून परमाणू चाचणी यशस्वीरित्या पार पडली अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर या व्हिडिओला एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com