Viral Video : भरधाव वेगात ट्रेन येत होती; तो गेला, रूळावर मान ठेवली अन् क्षणात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : भरधाव वेगात ट्रेन येत होती; तो गेला, रूळावर मान ठेवली अन् क्षणात...

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, अपघात सीसीटीव्ही फुटेज, लग्न, प्राणी यांच्या व्हिडिओचा सामावेश असतो. तर सध्या आत्महत्या करायला गेलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

हा व्हिडिओ RPF_INDIA या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून यामध्ये एक व्यक्ती काही वेळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा असलेला दिसत आहे. त्यानंतर गाडी येण्याचा अंदाज दिसला की रूळावर उतरतो आणि गाडी ज्या ट्रॅकवरून येत आहे त्या ट्रॅकवर मान ठेवतो. त्यानंतर काही क्षणात या प्रकाराकडे तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे लक्ष जाते.

येवढ्यात महिला पोलीस कर्मचारी धावत येते आणि त्याला बाजूला सारते. त्यानंतर वेगाने आलेली ट्रेन निघून जाते. या महिला कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचला नाहीतर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला असता. के. समंथी असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पूर्वा मेदीनीपूर स्टेशनवर ही घटना घडल्याचं सदर ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओतील तारखेनुसार हा व्हिडिओ २ जूनचा असल्याचं सांगण्यात येत आहे.