
Viral Video : धावत्या रेल्वेतच महिलेची झाली प्रसूती; गोंडस बाळ पाहून...
घरच्या घरी प्रसूती केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण धावत्या रेल्वेमध्ये एका महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. ही घटना नांदेड - मनमाड मराठवाडा एक्सप्रेसमध्ये घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या काही महिलांनी या गरोदर महिलेची मदत केल्याची माहिती आहे.
अधिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सदर महिला मराठवाडा एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. जालना ते करमाड स्टेशनच्या मध्ये हा प्रकार घडला असून प्रियंका अदीक असं प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. जालना स्टेशन सोडल्यानंतर सदर महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या.
तर पुढे आल्यानंतर या कळा अधिक तीव्र झाल्या. त्यामुळे प्रवास करत असलेल्या इतर महिलांनी या महिलेला मदत करत सुरक्षा दिली आणि तिला प्रसुतीसाठी मदत केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही मदत केली.
दरम्यान, या महिलेवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महिला आणि तिचे बाळ सुखरूप असल्याची माहिती असून या घटनेमध्ये मदत केलेल्या महिलांचे नेटकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.