
Viral Video : "भावा इथं आम्हाला लग्नाला मुली मिळेनात, तुला मिळाली तर तू एवढा भाव का खातो?"
अनेकदा आपल्याला हव्या त्या वेळेत आपलं लग्न होत नाही. तर अनेकजण मुलगी न मिळाल्याने तणावाखाली आहेत. त्यांच्या तुलनेत अनेक जणांचे वयाच्या २१ व्या २२ व्या वर्षी लग्न होत असते. काही लोकांनी आपलं लग्न होत असल्याचं काहीच नवल वाटत नाही. सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर करण्यात आला असून त्यामध्ये एक लग्न समारंभ सुरू असल्याचं दिसत आहे. लग्नामध्ये नवरदेवाला वरमाला घातल्यानतंर नवरी खूश होऊन डान्स करते पण नवरदेव तिच्याकडे साधं पाहतसुद्धा नाही. "मेरा सय्या सुपरस्टार" या गाण्यावर नवरी डान्स करत आहे.
दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर नवरदेवाला ट्रोल केलं आहे. "एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो?", "भावा इथं आम्हाला लग्नाला मुली मिळेनात, तुला मिळाली तर तू एवढा भाव का खातो?" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. "मी सुपस्टार नाही" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.