अविवाहित असल्याचं सांगून करत होता दुसरं लग्न; पहिली बायको अन् मेहुण्याने चोपला | Marriage Crime News | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage Crime News

Marriage Crime News: अविवाहित असल्याचं सांगून करत होता दुसरं लग्न; पहिली बायको अन् मेहुण्याने चोपला

Latest Marathi News: अविवाहित असल्याचं सांगून दोन लेकराचा बाप दुसरं लग्न करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ही घटना उत्तरप्रदेशमधील एटामध्ये घडली असून ही माहिती समोर आल्यानंतर सदर व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या भावाने नवरदेवाला मारहाण केली. त्यानंतर वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, कपिंजल यादव असं या व्यक्तीचं नाव असून त्याने 18 एप्रिल 2012 रोजी कासगंज येथील रहिवासी असलेल्या श्वेता यादवसोबत विवाह केला होता.

त्यावेळी त्याच्या सासऱ्याने २० लाख रूपये हुंडा आणि लग्नात मोठा खर्च केला होता. कपिंजल याला त्याच्या पहिल्या बायकोपासून दोन मुली आहेत पण त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी झाल्यानंतर ती आपल्या माहेरी निघून गेली होती.

दरम्यान, दुसरं लग्न करत असल्याची माहिती मिळताच श्वेता आणि तिच्या भावंडांनी कपिंजलला भर मंडपात मारहाण केली. वधूच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कपिंजल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. तर फरार झालेल्या कुटुंबियांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.