Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरची जंगल सफारी; शेअर केला बिबट्याचा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरची जंगल सफारी; शेअर केला बिबट्याचा Video

क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या फिरण्यात व्यस्त आहे. तो आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ देत आहे. तो सध्या जंगल सफारीला गेला असून त्याने बिबट्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही जंगल सफारीला जाण्याची इच्छा होईल.

सचिन नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत असतो. तर नव्या गोष्टी शिकण्यात त्याला रस असतो. त्याने जंगल सफारीला गेल्यानंतर बिबट्याचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. "लपाछपी खेळण्यात माहीर असलेल्याला तुम्ही शोधू शकता का?" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओवर टाकलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.