
Viral Video : याला म्हणतात मार्केटिंग! अंगावर टरबूजाच्या फोडी घेऊन उन्हातान्हात विक्री
एखाद्या वस्तूची अनेक प्रकारे मार्केटिंग करता येऊ शकते. तर अनेकदा मार्केटिंग न जमल्यामुळे अनेक वस्तू विकल्या जात नाहीत. सध्या एका टरबूज विक्रेत्या माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने अंगावर टरबूजाच्या फोडी लावल्या असून डोक्यावरही चरबूजाच्या फोडी दिसत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पुणे येथील वाकड परिसरातील असून एका व्यक्तीने टरबूज विक्रीसाठी एक शक्कल लढवली आहे. त्याने अंगावर एक पोस्टर गुंडाळलं असून पाठीमागे १०० ला तीन टरबूज असं लिहिलं आहे. त्याचबरोबर टरबूजाच्या फोडी अंगावर लटकावून हा व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.