Gujarat Couple: 'बस माझ्या बुलेटवर बुरूम बुरूम'! 77 वर्षिय अजोबांचा बायकोसोबत बुलेटवर भारत दौरा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Trip

Gujarat Couple: 'बस माझ्या बुलेटवर बुरूम बुरूम'! 77 वर्षिय अजोबांचा बायकोसोबत बुलेटवर भारत दौरा...

तुम्ही कधी साईडकार पाहिली आहे. ती पाहिल्यावर पहिले डोक्यात काय येतं....शोले मधला तो सीन. 'शोले' या प्रसिद्ध चित्रपटातील जय आणि वीरूची जोडी देखील आठवते. 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' हे गाणे तुम्हाला नक्कीच आठवत असेल. पण, हाच प्रश्न आम्ही ७७ वर्षीय मोहनलाल पी. चौहान यांना विचारला तेव्हा त्यांचे मत पूर्णपणे वेगळे होते.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, वडोदरा, गुजरातमधील मोहनलाल म्हणाले, "आमची कथा जाणून घेतल्यानंतर, तुम्ही जय-वीरूला विसराल आणि साइडकार मोटरसायकलसह, तुम्हाला फक्त आमची आठवण येईल."

मोहनलाल आणि त्यांची पत्नी लीलाबेन त्यांच्या 1974 च्या विंटेज रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटरसायकलवरून चार आश्चर्यकारक रोड ट्रिप केले आहेत. यादरम्यान त्यांनी आतापर्यंत 30 हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.

Road Trip

Road Trip

मोहनलाल यांनी प्रथम एकट्याने प्रवास करायला सुरुवात केली, ज्याचा त्यांना आनंद झाला, परंतु प्रवासादरम्यान त्यांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण आली. पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांनी काही खास व्यवस्था केली. लीलाबेन त्यांच्यासोबत बुलेटमध्ये आरामात बसू शकतील , म्हणून त्यांनी त्यांच्या बुलेटला साइडकार जोडली.

लीनाबेन आपल्या पतीबद्दल सांगतात, "त्याला घरी बसणे अजिबात आवडत नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला."

त्यांनी ओएनजीसीमधून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. त्यानंतर 2015 पासून त्यांनी एकट्याने छोट्या सहली करायला सुरुवात केली. ते म्हणतात, “मला अजूनही आठवतं, लहानपणी मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या स्कूटरने कसा फिरायला जायचो. निवृत्तीनंतर जेव्हा मी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की हा माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे.”

मोहनलाल सांगतात, “माझ्या पत्नीने माझ्यासोबत प्रवास करावा अशी माझी नेहमीच इच्छा होती. पण, 2010 मध्ये दुर्दैवाने लीलाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. यामुळे तिला नेहमी त्रास होत. तसेच तिला नीट चालताही येत नव्हते. तिला बुलेटमध्ये आरामात बसता यावे अशी माझी इच्छा होती. म्हणून, मी ही साइडकार माझ्या बुलेटला बसवली."

मोहनलाल आणि लीलाबेन यांचा प्रवास बघून 1977 मध्ये आलेल्या घरौंडा चित्रपटातील 'दो दिवाने शहर में' गाणे लक्षात येते. 2016 मध्ये बुलेटमध्ये साइडकार बसवल्यानंतर या जोडप्याने पहिल्यांदा एकत्र प्रवास केला. या प्रवासात त्यांनी वडोदरा ते महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू असा प्रवास केला.

या सुंदर प्रवासात दोघांनाही सीमा ओलांडून श्रीलंकेला जायचे होते, पण काही राजकीय तणावामुळे ते फक्त रामेश्वरमपर्यंतच जाऊ शकले. लीलाबेन म्हणतात, "रामेश्वरम येथे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हा एक अनोखा अनुभव होता.

" त्या पुढे म्हणतात की, हे नैसर्गिक दृश्य पाहण्याचा अनुभव ती कधीच विसरणार नाही. भारताच्या पहिल्या सहलीवरून परततानाही हे जोडपे त्यांच्या पुढच्या प्रवासाचे नियोजन करत होते.

ट्रिपचे नियोजन आणि समस्यांबद्दल विचारले असता मोहनलाल म्हणतात, “नियोजन करणे ही अडचण नव्हती, पण लोकांच्या प्रश्नांची आणि शंकांना उत्तरे देणे हे अवघड काम होते. 100-200 किलोमीटरच्या पुढे आपण जाऊ शकणार नाही, असा अनेकांचा समज होता.

फेब्रुवारी 2018 मध्ये, या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी, थायलंडला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. ते म्हणतात, “थायलंडला जाण्यासाठी आम्ही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाममार्गे मेघालयात पोहोचलो.

पण जेव्हा आम्ही मेघालयात पोहोचलो तेव्हा तिथे भूस्खलन सुरू झाले होते, त्यामुळे आम्हाला पुढे न जाण्याचा सल्ला देण्यात आला. थायलंडला न गेल्याचा त्याला खंत आहे. पण, त्याच वेळी, ते म्हणतात की ते जिथेही गेले, त्या सर्व त्यांच्या आयुष्यातील अमूल्य आठवणी बनल्या.

2018 मध्ये हे जोडपे मध्य प्रदेशातील चित्रकूटमधून जात होते. त्यादरम्यान लीलाबेनच्या दुखापतीमुळे त्यांची टाच फ्रॅक्चर झाली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांना जवळपास 15 दिवस रुग्णालयात राहावे लागले.

मोहनलाल आपल्या पत्नीचे कौतुक करताना म्हणतात, “माझी पत्नी खूप धैर्यवान स्त्री आहे, तिने कधीही हार मानली नाही. तिच्या पायाला प्लास्टर असूनही तिने प्रवास करण्यास होकार दिला. एकदाही तिने मला घरी परतायला सांगितले नाही. लीला माझ्या बुलेटच्या दुसऱ्या बॅटरीसारखी आहे.

Road Trip

Road Trip

या सहलींचे सर्व बजेट नियोजन करणाऱ्या लीलाबेन अभिमानाने सांगतात, “आम्ही आमच्या दैनंदिन खर्चासाठी 3,000 ते 4,000 रुपये बजेट ठरवले होते. यामध्ये आमची राहण्याची व्यवस्था, पेट्रोल आणि इतर खर्चाचा समावेश आहे. आम्ही आमच्या प्रत्येक सहलीवर सुमारे २ लाख रुपये खर्च केले आहेत.”

मोहनलाल म्हणतात, “आम्ही भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्य पाहिले आहे. प्रत्येक राज्य दुसऱ्यापेक्षा चांगले आहे. जर तुम्ही मला माझे आवडते राज्य विचाराल तर मी निवडू शकत नाही."

आपल्यापैकी बहुतेकांना प्रवास करताना घराची आठवण येते, तर लीलाबेन म्हणतात, “घरी बराच वेळ राहिल्याने मला आजारी असल्यासारखे वाटते. आपल्याला एकाच ठिकाणी थांबण्यासाठी नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि नवीन ठिकाणे पाहण्यासाठी बनवले आहे.”

2020 च्या सुरुवातीला या जोडप्याने शेवटचा बुलेटने प्रवास केला होता. त्यानंतर ते आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे गेले. मोहनलाल सांगतात, “जेव्हा आम्ही कुठेतरी राहतो, तेव्हा मी आचाऱ्याला आमच्यासाठी अगदी साधे जेवण बनवायला सांगतो. आम्ही शाकाहारी आहोत आणि कांदे आणि बटाटे व्यतिरिक्त आम्ही सर्व काही खातो.

मोहनलाल सांगतात, “पनीर पराठा, टोमॅटो सूप, व्हेज पुलाव, मसाला भात, दही आणि दिवसातून एक ग्लास दूध पिणे हे माझ्या आहारात समाविष्ट आहे. आम्ही कुठेही गेलो, मग ते दक्षिण भारत असो किंवा उत्तर भारत, आम्हाला नेहमीच आमच्या आवडीचे जेवण मिळाले."

टॅग्स :Gujarat