Viral Video : माकड अन् कोब्राची जुगलबंदी पाहिली का? व्हिडिओ पाहून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : माकड अन् कोब्राची जुगलबंदी पाहिली का? व्हिडिओ पाहून...

दोन जंगली प्राण्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. माकड - वाघ, साप - मुंगूस तर बिबट्या - हरिण अशा प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या चक्क माकडाचा आणि कोब्राच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड आणि कोब्रा यांच्यात झटापट चालली आहे. तर माकडाला बांधून ठेवलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर कोब्रा मोठा फणा काढून बसलेला आपल्याला दिसत आहे. फणा काढलेल्या कोब्राला माकडाने छेडल्यानंतरही कोब्रा त्याला काहीच करत नसल्याचं आपल्याला दिसत आहे.

दरम्यान, हे दोन्हीही प्राणी पाळीव असल्यामुळे ते एकमेकांवर हल्ला करत नसल्याचं काही जणांकडून सांगण्यात येत आहे. तर अनेक वेळा पाळीव प्राणी आपल्याला बऱ्याच कामामध्ये मदत केल्याचं पाहायला मिळतं. तर इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.