Viral Video : मरणाच्या दाढेतून वाचवल्यानंतर माकडाच्या पिल्लाने मारलेली मिठी पाहून डोळ्यात येईल पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मरणाच्या दाढेतून वाचवल्यानंतर माकडाच्या पिल्लाने मारलेली मिठी पाहून डोळ्यात येईल पाणी

सध्या एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती तारेमध्ये अडकलेल्या माकडाच्या पिल्लाला सोडवत आहे. तर मरणाच्या दाढेतून वाचवल्यानंतर माकडाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आपणही भावनिक व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला एक माकड तारेमध्ये अडकले आहे. तर ते अडकून पडल्यानंतर त्याला एका व्यक्तीने उचलले आणि त्याची तारेतून सुटका केली. बऱ्याच वेळानंतर त्याची सुटका झाली.

पण यानंतर माकडाने सदर व्यक्तीला जी मिठी मारली ते पाहून आपल्या डोळ्यात पाणी येईल. व्यक्तीने यानंतर माकडाच्या पिल्लाला आंबा खाऊ घातला आहे. तर या कृतज्ञ व्यक्तीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

टॅग्स :Monkeyviral video