
Viral Video : माकड अन् मोबाईलवाल्याची गोष्ट! पुस्तकातील टोपीवाल्याच्या गोष्टीचं लेटेस्ट व्हर्जन
आपण शाळेत असताना माकड अन् टोपीवाल्याची गोष्ट ऐकली असेल. एका झाडावरील माकडं टोपीवाल्याच्या टोप्या चोरून झाडावर जातात. त्या टोप्या परत मिळवण्यासाठी टोपीवाल्याला माकडांना खायला द्यावं लागतं. माकडांना खायला दिल्यानंतर माकडाने त्याच्या टोप्या त्याला परत दिल्या अशी ती गोष्ट होती. पण या गोष्टीचा खरा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आला आहे.
सध्या माकडाचा आणि काही गावकऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये माकडाने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला आहे. तर त्याच्या बदल्यात सदर व्यक्ती त्याला फ्रुटी देताना दिसत आहे. माकडाच्या हातात फ्रुटी पडल्यानंतर लगेच माकड सदर व्यक्तीचा फोन खाली टाकून देत आहे.
दरम्यान, मोबाईलच्या बदल्यात माकडाला फ्रुटी द्यावी लागली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला शाळेतील माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट या धड्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तर माकड अन् टोपीवाल्याच्या गोष्टीचं लेटेस्ट व्हर्जन असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. नेटकऱ्यांकडून हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.