
Viral Video : पर्यटकांना दगडं मारत होतं चिंपाझी; त्याच्या आईने काठीने झोडपलं
आई ही आईच असते, ती मुलांना चांगलंंच वळण लावत असते. त्याचबरोबर आपल्या मुलाची काळजीही ती तेवढ्यात जबाबदारीने घेत असते. मग ती माकडाची आई असली तरीही... सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका चिंपाझीला त्याच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका पर्यटनस्थळावरील असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी चिंपाझीचं एक पिल्लू पर्यटकांना दगड फेकून मारताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या आईने त्याला काठीने मारलं आहे. आईने मारल्यानंतर चिंपाझीचं पिल्लू मागे पळून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.