
Viral Video : पोटच्या 10 महिन्याच्या बाळाला सोडून देशसेवेसाठी; आईच्या डोळ्यातील पाणी...
आई ही आईच असते. आपल्या लेकरांना मोठं करण्यात तिचा मोठा वाटा असतो. एखवेळी ती उपाशी राहते पण लेकांना पोटभर खायला घालते अशी आई असते. पण पोटच्या दहा महिन्याच्या लेकराला सोडून देशसेवेसाठी जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या दहा महिन्याच्या बाळाला सोडून देशसेवेसाठी जाताना दिसत आहे. तिच्या बाळाला कडेवरून दुसऱ्याकडे देताना तिच्या डोळ्यात अश्रू आल्या आहेत. वर्दीवरील नावाप्रमाणे या महिलेचे नाव वर्षा पाटील असं असून हा हृदयद्रावक व्हिडिओ आपल्याही डोळ्यात पाणी आणेल.
दरम्यान, तिला सोडायला तिच्या कुटुंबातील काहीजण आले असून त्यांच्याही डोळ्यात या क्षणी पाणी आले आहे. तर बाळाला कुटुंबियांकडे दिल्यानंतर तिला फुटलेला हुंदका पाहून उपस्थितही भावूक झाले आहेत. या रणरागिनीला सलाम... ही महिला कोल्हापूर येथील नंदगाव येथील रहिवाशी आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.