Mumbai Crime : वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण; Video होतोय Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime

Mumbai Crime : वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण; Video होतोय Viral

मुंबई : मुंबईत भर रस्त्यावर वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. लाल दिवा लावून गाडी चालवली म्हणून वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवल्याच्या कारणावरून या पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये काही व्यक्ती वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करताना दिसत आहेत. हेल्मेट न घातल्यामुळे आणि लाल लाईट लावून गाडी चालवल्यामुळे वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली होती. पण दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना मुंबईतील कुर्ला येथे घडल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, मारहाण करत असताना दुसरा पोलीस कर्मचारी मध्यस्थी करून हे भांडण सोडवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.