Viral Video : मुंबईच्या गल्लीत वर्ल्ड फेमस DJचा भन्नाट डान्स; पब्लिक झाली सैराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance

Viral Video : मुंबईच्या गल्लीत वर्ल्ड फेमस DJचा भन्नाट डान्स; पब्लिक झाली सैराट

मुंबईतील एका गल्लीतील रस्त्यावर DJ Madam X हिने भन्नाट डान्स केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मंडळाने इंग्रजी गाणं लावलं आणि मंडळाच्या एका कार्यकर्त्यांनी गाण्यावर डान्स केला. त्याबरोबर Madam X नेही त्याच्यासोबत डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील असून तिथे परदेशी जोडपे फिरायला आले असल्याचं दिसत आहे. ते जात असताना मंडळाच्या एका कार्यकर्त्याने तिच्या सोबत भन्नाट डान्स केला. तिही मुंबईमध्ये इंग्रजी गाण्यावर थिरकली आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून एक दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.