Video : "तुम्ही साप खाता का? कुत्रा खाता का? असे प्रश्न विचारतात, आम्ही काय जंगलातून आलो का?"

स्थानिकांच्या प्रश्नाने नागालँडची तरूणी संतप्त
Video
Video Sakal

फरिदाबाद : हरियाणा येथे पर्यटनासाठी आलेल्या नागालँड येथील तरूणीने आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. "आम्ही पण भारतीय आहोत, ना की दुसऱ्या देशातले, आम्हाला असे विचित्र प्रश्न लोकं का विचारतात?" अशा शब्दांत तरूणीने संताप व्यक्त केला आहे. हे बोलताना सदर तरूणी भावूक झाल्याचंही आपल्याला दिसत आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, सिंडी असं या पिडीत तरूणीचे नाव आहे. ती तिच्या काही सहकाऱ्यांबरोबर हरियाणा येथे पर्यटनासाठी आली होती. तर स्थानिक नागरिकांनी त्यांना विचित्र प्रश्न विचारले आहेत. "तुम्ही नागालँडचे आहात तर साप खाता का? कुत्रा खाता का? तुमच्या इकडे गहू मिळतात का? डाळ रोटी मिळते का? असे प्रश्न आम्हाला विचारण्यात आले.

तुम्ही आम्हाला नागालँडबद्दल विचारा ना, आम्ही सांगू... नागालँड हे भारतातीलच एक राज्य आहे, तिथे सुद्धा चांगला निसर्ग आहे. आम्ही काय जंगलातून आलो आहोत का? पण या लोकांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत मला खूप वाईट वाटत आहे" असं या तरूणीने सांगितलं आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com