Viral Video : ओव्हरटेक करण्यावरून वाद; नागपुरात महिलेला भररस्त्यात मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : ओव्हरटेक करण्यावरून वाद; नागपुरात महिलेला भररस्त्यात मारहाण

रस्त्यावर दुसरी गाडी ओव्हरटेक करण्यावरून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून ही घटना महाराष्ट्रातील नागपूर येथे घडली आहे. महिलेला मारहाण केल्यानंतर स्थानिकांनी हा वाद सोडवला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नागपूर येथील जरीपटका परिसरातील आहे. एक टॅक्सी चालक आणि महिलेमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर टॅक्सी चालकाने खाली उतरून महिलेला जबर मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी भांडणे मिटवले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, शिवशंकर श्रीवास्तव असं आरोपी असलेल्या टॅक्सी चालकाचे नाव असून तो इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर महिलेने सदर टॅक्सीचालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpurpolicecrimewomen