Viral Video: चालू गरब्यात उपटल्या तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या | Nashik Navratri Festival | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: चालू गरब्यात उपटल्या तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या

सध्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे धामधूम कायम आहे. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आहे. गरबा, जागरण सुरू आहे. या संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होणार.

नाशिक येथे गरबा खेळताना तरुणींच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सध्या या व्हिडीओची सोशल मीडीया प्रचंड चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: Video Viral : गरबा खेळता खेळता घात झाला; हृदयविकाराने तरूणाचा दुर्दैवी अंत

नाशिकच्या इगतपुरी येथे एका नवरात्रीच्या कार्यक्रमादरम्यान तरुणींच्या दोन गटात वाद उफाळून आला. वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात प्रचंड हाणामारी झाली आणि त्यांनी चक्क एकमेकांच्या झिंज्या उपटल्याचे व्हिडीओत दिसते.

ही घटना घडत असताना आजुबाजूचे मुलं आणि पुरुष त्यांची हाणामारीचा आनंद लुटताना दिसत होते. एवढचं काय तर काहीजण घटनेचा व्हिडीओसुद्धा रेकॉर्ड करत होते. पण कोणीच त्यांना थांबवले नाही.

हेही वाचा: Viral Video: ...म्हणून मला निलंबित केलं, इन्स्टावर फेमस महिला कंडक्टरने मांडली व्यथा

गरबा खेळताना सुरवातीला अचानक सुरु झालेल्या हाणामारीत दोन तरुणी एकमेकींचे केस ओढत होत्या. यासोबत अन्य मुलीही ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्या अन्य मुलीही या हाणामारीत सहभागी झाल्या.

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत.