मातृत्व! जन्मानंतर आईचा पहिला कीस अन् नवजात बालकाचं रडणं बंद; Video होतोय Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

मातृत्व! जन्मानंतर आईचा पहिला कीस अन् नवजात बालकाचं रडणं बंद; Video होतोय Viral

आईचा महिमा कितीही गायला तरी कमीच असतो. प्रत्येक आई आपल्या लेकरांसाठी जीवही द्यायला मागेपुढे बघत नाही. लेकरू कसेही असो प्रत्येक आईसाठी ते प्रिय असते. आईचा प्रेमाचा स्पर्श प्रत्येक लेकराला जाणवतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेची प्रसूती झाली असून हॉस्पिटलमधील नर्स तिचे बाळ तिच्याकडे घेऊन येते. नर्सच्या हातात असताना बाळ मोठ्याने रडत आहे. तर आईच्या जवळ आणल्यानंतर आई त्याच्या गालावर कीस करते. आईचा स्पर्श झाल्यानंतर लगेच बाळ रडायेच थांबते आणि शांत बसते.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपणसुद्धा अचंबित व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका बाळासाठी त्याच्या आईचा स्पर्शसुद्धा पुरेसा असतो असं कॅप्शन या व्हिडिओवर देण्यात आलं आहे.