Viral Video : गौतमीला पाहून आजोबांना सुधरेना; पाय अडखळले, कुठं जावं ते कळेना | Gautami Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil

Viral Video : गौतमीला पाहून आजोबांना सुधरेना; पाय अडखळले, कुठं जावं ते कळेना | Gautami Patil

सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच चर्चा आहे. तिने आपल्या डान्समधून तरूणाईला जणू वेडच लावलंय. अनेक गावांत तिच्या कार्यक्रमात राडा झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. लहान मुलांच्या वाढदिवसाला तर बैलांच्या वाढदिवसाला तिचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचंही आपण पाहिलं.

सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या पोस्टरचा आणि एका आजोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गौतमीचा फोटो पाहून आजोबालाही काही वेळ सुधरत नाही. बराच वेळ आजोबा फक्त तिच्या फोटोकडे पाहताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या आजोबालाही गौतमीने वेड लावलंय अशा प्रतिक्रिया अनेकांनी केल्या आहेत.

दरम्यान, या आजोबांनी त्यांच्या काळातले फड गाजवले आहेत अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील असून तेथील रायगड ग्रुपने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचं पोस्टरमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.