
Viral Video : आज्जींचा स्वॅग! कस्टमर केअरवालीला नडली; म्हणली "तू कशाला लई बोलती!"
अनेक वयस्कर लोकांना अॅन्ड्रॉईड फोनबद्दल जास्त माहिती नसते. तर अनेकजणांना फोनही लावता येत नाही. फोन लावता न येणारे ग्रामीण भागातील अनेक वयस्कर व्यक्ती आपण पाहिले असतील. पण सध्या अशाच एका आजीबाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती फोनवर बोलताना दिसत आहे.
समोरच्या व्यक्तीने फोन उचलला नाही तर फोनवर रेकॉर्डेड ऑडिओ आपल्याला ऐकू येतो. तर या वयस्कर महिलेने रेकॉर्डेड ऑडिओ ऐकून त्या आवाजावर मजेशीर उत्तर दिलं आहे. "आपने जिस व्यक्ती को कॉल किया है, वो अभी उत्तर नही दे रहा है..." असा ऑडिओ ऐकायला आल्यानंतर, "तो फिर तू क्यू दे रही है उत्तर..." असं आजी बोलताना दिसत आहे.
या आजीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या आजीचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या मजेशीर कमेंट वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.