नवऱ्याला भररस्त्यात अटॅक आला; ती हात जोडत गाड्यांना थांबवत होती पण अखेर... | CCTV Footage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

नवऱ्याला भररस्त्यात अटॅक आला; ती हात जोडत गाड्यांना थांबवत होती पण अखेर... | CCTV Footage

सध्या जगात माणुसकी राहिली नाही असं सर्रास बोललं जातं. अनेकदा संकटकाळी वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांचा जीव जातो. असे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक वृद्ध महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या वृद्ध पतीसोबत रस्त्याने जात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि ते खाली पडतात. त्यानंतर महिला रस्त्याने जात असलेल्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण एकही वाहन थांबत नाही. ती प्रत्येक वाहनांंना हात जोडून थांबवण्याचा प्रयत्न करत असते.

दरम्यान, शेवटी एक चारचाकी गाडी तिथे थांबते. गाडीतून एक महिला आणि पुरूष उतरतात. पुरूष वृद्ध व्यक्तीच्या छातीवर दाब देऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांची कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने ते त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.