Viral Video : याला म्हणतात धाडस! ज्यासाठी भलेभले घाबरतात ते 3 वर्षाच्या पोरीने लीलया केलंय

या मुलीचं धाडस पाहून आपणही चकित व्हाल
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे सध्या तरूणाईसाठी मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती झीपलाईन हा गेम खेळताना दिसत आहे. ती फक्त दोन ते तीन वर्षाची असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

आपणही कधीतरी झीपलाईन गेम खेळला आहे का? खूप कमी जणांना हा खेळ खेळताना भिती वाटत नाही. तर अनेकजण दोरीवर लटकलेले असताना घाबरून जातात पण या चिमुकलीच्या धाडसाला मानलं पाहिजे. ही मुलगी कसलीच न घाबरता व्यवस्थितपणे हा खेळ पूर्ण करते. तर जे भल्याभल्यांना जमत नाही ते या पोरीने लीलया करून दाखवलंय.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला ३ लाख १३ हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर या चिमुकलीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com